जशी शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ तसेच स्वार्थांपेक्षा समाजसेवा श्रेष्ठ
सामाजिक स्तरावर भारतातील प्रत्येक व्यक्तीला सरकारद्वारे महत्त्वाचे असे व्यक्ती स्वातंत्र्य तसेच महत्त्वाच्या अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकार वारंवार प्रयत्न करत असते. आपल्या देशाची लोकसंख्या ही खूप जास्त आहे त्यामुळे वैयक्तिकरित्या प्रत्येक व्यक्ती पर्यंत सरकारी सुविधा काही वेळा पोहोचणे अवघड होऊन जाते. जनशक्ती सामाजिक सेवाभावी संस्था ही एक कल्याणकारी संस्था आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार व तसेच केंद्र सरकार यांच्यामार्फत महत्त्वाच्या अशा मिळणाऱ्या सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात येणार आहे
आपला भारत देश अजूनही विकसनशील देश आहे. आपल्याला आणखीही भरपूर प्रमाणात पुढे जाणे खूप गरजेचे आहे. पाश्चात्य देशांशी आपला विचार करता अजूनही आपण मागासवर्गीय देशांमध्ये गणले जातो. आधुनिक यंत्रणा आधुनिक सामुग्री या सोबतच सर्वात जास्त महत्त्वाचे आहे ते म्हणजे समाजातील लोकांचे सशक्तिकरण आणि सशक्तिकरणासाठी मनुष्यबळ, सामाजिक एकता तसेच मूलभूत सुविधा इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सर्व गोष्टींचा दृष्टिकोन समोर ठेवून जनशक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे
सामाजिक एकता आणि सामाजिक विकास या दोन गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी अत्यंत महत्त्वाच्या अशा सामाजिक अंतर, गरिबी, अशिक्षित पणा अशा भरपूर काही समस्या आहेत जे आपल्याला शहरी भागात देखील बघायला मिळतात. माझा देखील जन्म गरीब कुटुंबात झाला असल्यामुळे गरीब लोक त्यांच्या समस्या त्यांचे दैनंदिन जीवन त्यांच्या न भागणाऱ्या गरजा या सर्व समस्या मी डोळ्यांनी पाहून अनुभवलेले आहेत. कामाच्या ठिकाणी तसेच कामा बाहेर काही चांगल्या मित्रांची ओळख झाली आणि आमचे विचार पटल्यामुळे आम्ही एकत्रित येऊन काहीतरी करावयाचे ठरवले कोठेतरी आपणही समाजाचे देणेकरी असतो त्यामुळे जमेल त्या मार्गाने जमेल तेवढ्या प्रमाणात सामाजिक एकता, सामाजिक विकास आणि गरजू लोकांना मदत तसेच शासनाकडून उपयुक्त असणाऱ्या गोष्टी गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे
सामाजिक एकता आणि सामाजिक विकास या धोरणांवर आधारित संस्थेमार्फत तसेच मित्र परिवारांच्या सहाय्याने खालील प्रमाणे कामे करण्यात आलेली आहेत.
कोरोना काळामध्ये खूप कुटुंबांना रोजचे जीवन जगणे खूप जगणे अवघड झाले होते, हे आम्हाला खूपच जाणून आले. रोजचे कामकाज नसल्यामुळे गरिबांना खूप हाल चालले होते. आपल्या परीने एक मार्गाने सर्वजण गरीबांना मदत करत होते. त्या मार्गाने मित्रांच्या सहाय्याने जेवण वाटण्यात आले.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्रत्येक माणसांनी प्यायला हवे. आपल्या समाजात बहुसंख्य असे हुशार व होतकरू विद्यार्थ्या आहेत पण काही कारणास्तव त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा एक भाग म्हणून संस्थेतर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती. तुकाराम महाराजांची ही ओवी ऐकताना मन कसे प्रसन्न होऊन जाते. याचा खराखोरा आनंद घेण्यासाठी आपले मित्र वाढवा म्हणजेच पर्यावरणाचै संरक्षण करण्यासाठी झाडे वाढवा. संस्थेच्या मार्फत झाडे लावण्याचे कार्यक्रम राबवण्यात आले.
शरीराने धष्टपुष्ट राहण्यासाठी सर्वात जास्त महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी व शुद्ध वातावरण आणि या सर्व गोष्टींची मूळ पायाभरणी आहे स्वच्छता. त्याच गोष्टीला अनुसरून संस्थेतर्फे स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली
जनशक्ती सामाजिक सेवा-प्रवृत्त संस्था नियमित वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करते, जिथे समुदायातील लोक एकत्र होतात आणि सहभागाने वृक्ष रोपतात. हे कार्यक्रम समुदायातील सामाजिक, पर्यावरणीय, आणि आर्थिक सुधारणा करते आणि समुदायाच्या सामाजिक संकल्पनांच्या संवर्धनात मदत करतात.
करोणा काळामध्ये भरपूर अशा कुटुंबाचे जगणे खूप जगणे अवघड झाले होते. दैनंदिन कामकाज व पैसे नसल्यामुळे लोकांचे खूप हाल चालले होते. आपल्या परीने जमेल त्या मार्गाने सर्वजण गरिबांना मदत करत होते त्याचाच एक भाग म्हणून वैयक्तिक तसेच मित्रांच्या आर्थिक सहाय्याने गरिबांना राशन वाटण्यात आले
संघटनेचे कार्यकर्ते समुदायातील समस्यांचे समाधान करण्याची जबाबदारी घेतात. त्यांची कामे समुदायातील उत्थान आणि समृद्धीसाठी समर्पित असतात।
जशी शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ तसेच स्वार्थांपेक्षा समाजसेवा श्रेष्ठ
शिवकाळात सुखाने नांदत होती प्रजा। म्हणूनच प्रजा म्हणे जाणता राजा माझा। आपण शिवभक्त करूया प्रयत्न करावया एक उत्तम समाजसेवा.
समाजसेवेसाठी काय पण।
जनशक्ती आज पण।
उद्या पण.
जनसेवा हीच खरी
ईश्वर सेवा
समाजसेवेसाठी काय पण।
जनशक्ती आज पण।
उद्या पण.
जनसेवा हीच जग सेवा म्हणजेच लोकांची सेवा करणे हे विश्वाची सेवा.
बाप्पाची भक्ती, मनाची युक्ती हेच आपली जनशक्ती!🚩🧡
शिवकाळात सुखाने नांदत होती प्रजा। म्हणूनच प्रजा म्हणे जाणता राजा माझा। आपण शिवभक्त करूया प्रयत्न करावया एक उत्तम समाजसेवा.
जनसेवा हेच मनशांतीचा मार्ग
मनशांती हेच सनातनची क्रांती
सनातन हेच एकता क्रांती
निस्वार्थ सेवा आणि समर्पणाचा भाव हवा
माणसांमध्ये माणुसकी हवी
बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात जगापासून नाही तर स्वतःपासून करायला हवी.
शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या मराठी आणि हिंदूत्वाच्या महत्त्वाच्या मूल्यांचा समर्थन करणारे सामाजिक कार्यकर्ता।!
जनसेवा ही ईश्वर सेवा आहे
सेवा ही मनोभावे केली पाहिजे.
नेटवर्क तयार करा, मजबूत, कार्यशील संबंध विकसित करात्यामध्ये कामाचा विशिष्ट प्रकार, ते काम कसे पूर्ण केले जाईल, कामासाठी आवश्यक कौशल्ये आणि कामाचा उद्देश यांचा समावेश असावा. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा🙌🏻🙏🏻नक्कीच हेच समजा साठी हे आपला एक उत्कर्ष योगदान असेल✌🏻🙏🏻
जनते मध्ये उत्तरुण जनतेची सेवा करणे हेच
जनशक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेची उद्दिष्ट 🚩🚩
जेव्हा आपण इतरांच्या सेवेत स्वतःला हरवून बसतो
तेव्हा आपण स्वतःचे जीवन आणि स्वतःचा आनंद शोधतो.
आपल्याला काही प्रश्न आहेत का? किंवा आपल्याला आमच्या कामाबद्दल कोणतेही माहिती पाहिजेत का? तर आम्हाला संपर्क साधून आमच्या संस्थेला सहाय्य करा.